
Breaking Newsमहाराष्ट्र
पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ
केंद्र सरकारनं आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आलीय. आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आलीय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.
कोविड १९ संक्रमणादरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढविली जात असल्याचं म्हटलं गेलंय. ३१ मार्च २०२१ ऐवजी आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येणार आहे.