
Breaking Newsनागपूरमहाराष्ट्र
मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली
हायकोर्टाने याचिकाकर्ता जयश्री पाटलांना झापलं
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय. अॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच हा लोकप्रियतेसाठी केलेला स्टंट असल्याचं सांगत पाटील यांना फटकारलं
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलीचे आरोप केल्यानंतर जयश्री पाटील यांनी देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. “भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे,” अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रार केली होती