
पश्चिम विदर्भ
नवनीत राणा-रवी राणां यांच्या फोटोंना चपलांचा हार घालत घोषणाबाजी
हिंदू धर्मीयांची भावना दुखावला गेल्याचा आरोप
मेळघाटमधील RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात हरिसालमधील आरोपी विनोद शिवकुमार आणि मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निषेधार्थ होळी करण्यात आली होती. या होळीत राणा दाम्पत्याने चपलांचा वापर केला होता. त्यामुळे हिंदू धर्मीयांची भावना दुखावला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
राणा दाम्पत्याच्या फोटोंना हार
होळीसारख्या हिंदू धर्मीयांच्या पवित्र सणाचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हरीसाल येथे अपमान केल्याचा आरोप शिवसेनेने केला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेने राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक आंदोलन केले. त्यानंतर दोघांच्या फोटोला चपलांचा हार घालत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.