पूर्व विदर्भ

गडचिरोलीत 5 नक्सलवादी ठार, पोलिसांचे मोठे यश

2 महिला,3 पुरुषांचा समावेश

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील पोलिसांनी राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठं यश आलं आहे. पोलीस कारवाईत पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली.पोलिसांच्या नक्षलविरोधी ​सी-६० पथकाने​ ३ दिवसापासून राबवलेल्या अभियानात ​५ नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी झाली आहे. ​३ पुरुष ​२ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक(अभियान) मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात हे अभियान राबवले गेले होते. या कारवाईनंतर गडचिरोली मुख्यालयात मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य-बंदुका- स्फोटके आणि दैनंदीन साहित्य ताब्यात आल्याची माहिती देण्यात आली.

काडतुसे, मॅगझीन, ​३ प्रेशर बॉम्ब, सुतळी बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल आदीचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात गस्त घालण्यासाठी गेलेल्या सी-​६० कमांडोच्या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. सध्या तेथील गोळीबार थांबला आहे, असं गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी आता शोध मोहीम राबवली जात आहे.​५ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोरपर्सी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती. सुमारे ​१२ तास चाललेल्या चकमकीत सी​-६० चा एक जवान शहीद झाला होता. चकमकीदरम्यान काही सैनिकही जखमी झाले. तेथे काही सैनिक अडकलेही होते. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!