पश्चिम विदर्भ

30 दिवसात उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करावा

वाशिम, दि. 26 (जिला प्रतिनिधी) : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या एकूण 6 पंचायत समित्यांच्या पोट निवडणूकांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होवून 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली. निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या 10 ऑगस्ट 2015 च्या आदेशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब तसेच निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विहीत नमुन्यात, शपथपत्रासह एकत्रित खर्चाचा तपशिल सादर करणे बंधनकारक आहे.

तरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकीमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व उमेदवारांनी, पराभूत उमेदवारांनी तसेच निवडून आलेल्या सदस्यांनी विहीत मुदतीत म्हणजे 30 दिवसांच्या आत विहीत रितीने निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाचा अंतीम तपशिल आपल्या तालुक्याचे संबंधित उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कळविले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!