पश्चिम विदर्भ

समीर वानखेडेचे वाशिम जिल्ह्यातील हे मूळ गाव आता चर्चेत, त्यांचे काका….

वाशिम दिनांक 25 ऑक्टोबर (विशेष प्रतिनिधी)

ड्रग्स केस मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक झाल्यापासून एक नाव सतत चर्चेत आहे ते म्हणजे एनसीबी चे अधिकारी समीर वानखडे

महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी समीर वानखडे चे वडील यांच्याबद्दल विधान केल्यानंतर त्यांचे मुळगाव कोणते याबाबत चर्चा सुरू झाली असून माय भूमी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार समीर वानखेडे यांचे वडील वाशिम जिल्हातील रिसोड तालुक्यात राहत होते

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे वाशिम जिल्हातील रिसोड तालुक्यातील वरूड तोफाचे रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण वाशीम जिल्ह्यातच झाले. मुंबई येथे पोलीस विभागात अधिकारी म्हणून नोकरी निमित्त गेले असता त्याठिकाणीच ते स्थायिक झाले. समीर वानखेडे यांचे मोठे बाबा (त्यांच्या वडिलांचे मोठे भाऊ ) दत्तनगर लाखाळा येथे सध्या राहत असून ते ही मुंबई येथे अधिकारी होते.

समीर वानखेडे यांचे मूळ गाव असलेले वरूड तोफा हे गाव वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असून वाशीम-रिसोड मार्गावरील आसेगावपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांचे वडिलोपार्जित घर व शेती आहे. त्यांचे काका, काकू व भावंड येथे राहतात.

समीर वानखेडेंचे सख्खे काका अजूनही वाशीम जिल्ह्यातील लाखाळा या गावात राहतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!