
महाराष्ट्र
ड्रायव्हिंग लायसनसाठी आता पास करावी लागणार कठीण टेस्ट
केंद्रीय मंत्री नितिन गडकरींची घोषणा
ड्रायव्हिंग लायसनसाठी आता कठीण टेस्ट पास करावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती गुरुवारी लोकसभेत दिली. त्यांनी सांगितलं की, 69 टक्के गुण मिळवणाऱ्यांनाच लायसन दिलं जाईल.
तसंच तीन आणि चार चाकी वाहने रिव्हर्स घेताना चालकांचे वाहनांवर चांगलं नियंत्रण असणं गरजेचं आहे. गडकरी यांनी लेखी उत्तर देताना म्हटलं की, रस्ते अपघात रोखण्यासाठी चालकाकडे कौशल्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे लायसनची चाचणी कठीण करण्यात आली आहे. यामध्ये रिव्हर्स गिअर असलेल्या गाड्या मागे घेणं, डावीकडे – उजवीकडे कमी जागा असताना न अडखळता गाडी मागे घेता आली पाहिजे. यासर्व बाबींवर चालकाची चाचणी घेतली जाईल असंही गडकरींनी सांगितलंय.