पूर्व विदर्भ

आज महात्मा गांधी जयंती: जिल्हा प्रशासनाने केली पदयात्रा

 पदयात्रेत जिल्हा अधिकारी तथा सर्व कर्मचारी अधिकारी सामील

 वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने कार्यक्रम

वर्धा, दि. 2 : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यापासून ते बापू कुटी सेवाग्राम पर्यंत पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार जीएसटी आयुक्त नाशिक स्मिता डोळस, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ .सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुणे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने, तहसीलदार रमेश कोळपे नायब तहसीलदार बाळू ताई भागवत नायब तहसीलदार जाधवर यासह अन्य कर्मचारी अधिकारी या पदयात्रेत सामील झाले होते. वर्धेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ते बापूकुटी पर्यंत पदयात्रा करण्यात आली होती

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषद सीईओ सचिन ओंबासे यांनी बापू कुटी च्या आत जाऊन प्रार्थना केली त्यांना नमन केले आणि आश्रमातील कार्यक्रमात सहभाग घेतला.यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमिताने वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोनाचा पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने याठिकाणी कार्यक्रम होत आहे. प्रार्थना, रामधून त्यासोबतच ग्रामसफाई व अखंड सूतकताई करून आदरांजली वाहण्यात आली.

महात्मा गांधीजींच्या विचारांवर जिल्हा प्रशासन काम करीत आहे प्रशासन आपल्या दारी या अंतर्गत अनेक उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. असे जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!