नागपूर

बॅडमिंटन खेळाडूंची 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान निवड चाचणी

नागपूर दि. 29 : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया सेंटर जिल्हयात मंजूर करण्यात आली आहे. या केद्रांमध्ये बॅटमिंटन खेळाडूंची निवड करण्यासाठी 4 ते 6 ऑक्टोबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे चाचण्याचे आयोजन करण्यात येत आहे.

या चाचण्याअंतर्गत 30 खेळाडूची निवड करण्यात येणार आहे. बॅटमिंटन या खेळाच्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी विचारात घेण्यात येईल. या चाचण्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूची जन्मतारीख 1 जानेवारी 2002 नंतर असावी.

इच्छुक पात्रताधारक खेळाडूंनी आपले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे चाचण्याचे दिवशी 4 ऑक्टोबरला सकाळी 10 ला सादर करावे. या चाचण्यांकरीता येणाऱ्या खेळाडूंनी चाचणीपूर्वी स्वत:च्या नावाची नोंद करणे बंधनकारक राहील. चाचण्यांकरीता येणाऱ्या खेळाडूंनी स्पर्धेचे प्राविण्य, सहभाग प्रमाणपत्र चाचणीस्थळी सादर करावे. अर्जासोबत आधारकार्ड व प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित सत्यप्रत सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!