महाराष्ट्र

राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर; राज्यातील 14 जिल्हे अनलॉक,वाचा नवीन नियम

राज्य सरकारने करोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली (New Guidelines) जाहीर करत राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे.

ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येत आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र मनोरंजन स्थळे आणि पर्यटन तसेच धार्मिक स्थळे ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. (maharashtra govt issues new guidelines for corona theaters cinemas restaurants tourist spots and religious places in 14 districts at 100 per cent capacity)

राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार, लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या सभागृहातील एकूण क्षमतेच्या ५० टक्के इतकी परवानगी देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालये मात्र पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत.

या बरोबरच लशींचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना आंतरराज्यीय प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसचे सरकारने ऑफलाइन शाळाही सुरू करण्याची मुभा दिली आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहेत. या बरोबरच रेल्वे, तसेच बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारकच करण्यात आले आहेत.

राज्यातील चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणच्या प्रवेशासाठी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारकच आहे. मनोरंजन व उद्याने जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याच्या परवानगी देण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे लग्नसमारंभ तसेच अत्यंसंस्कार विधी अशा कार्यक्रमांवरील निर्बंधही हटवण्यात आले आहेत.

 

राज्यातील कोणत्या १४ जिल्ह्यांमध्ये होणार सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स १०० टक्के क्षमतेने सुरू, पाहा!

> मुंबई शहर

> मुंबई उपनगरे

> पुणे

> भंडारा

> सिंधुदुर्ग

> नागपूर

> रायगड

> वर्धा

> रत्नागिरी

> सातारा

> सांगली

> गोंदिया

> चंद्रपूर

> कोल्हापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!