ग्रामीण

ट्रक अपघातात जख्मी ट्रक चालकांचा मृत्यु

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर बायपास चारपदरी रोडवर खंडाळा शिवारातील कुंभ लकर ढाब्या जवळ नितिन पांडुरंग दुधे यांचा ट्रक हा पाचगाव वरुन एनटीपीसी मौदा येथे राखड भरायला जात असतांना कुंभलकर ढाब्या जवळ ट्रक ने समोर जात असलेल्या एका अज्ञात टिप्पर ला मागुन जोरदार धडक मारल्याने चालक गंभीर जख्मी झाला व त्याला नागपुर राधाकृष्ण रुग्णालय येथे उपचार सुरु असतां ना त्याचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या चौकशी अहवाला वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .

नितिन पांडुरंग दुधे वय ३२ वर्ष रा. तासगाव कापसी यांनी पोस्टे ला येवुन अर्ज दिला की त्यांचा ट्रक (टिप्पर) क्र. एम एच ४० बी एल ५११७ हा पाचगाव वरून एनटीपीसी मौदा येथे राखड भरायला जात असतांना गुरुवार (दि.२३) सप्टेंबर २०२१ ला रात्री १ वाजता दरम्यान नेशनल हाईवे क्र.४४ नागपुर जबलपुर बायपास चारपदरी रस्त्यावरील खंडाळा शिवारातील कुंभलकर ढाब्याजवळ ट्रक (टिप्पर) क्र. एम एच ४० बी एल ५११७ ने समोर जात असलेल्या एका अज्ञात टिप्पर ला मागुन जोरदार धडक मारून ट्रक (टिप्पर) चा चालक श्याम देवराव शाहु हा जख्मी झाला असुन ट्रकचे अंदाजे १०,००,००० रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगत असुन जख्मी यास मेडिकल कॉलेज नागपुर येथे भरती केल्याचे सांगितले. सदर अर्जाचे संबंधाने घटनास्थळी जावुन पाहणी केली असता ट्रक (टिप्पर) क्र.एम एच ४० बी एल ५११७ हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ नागपुर जबलपुर बायपास चारपदरी रोड वर मनसर कडे जाणाऱ्या रोडवर उभा असुन वाहनाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

तसेच जख्मी चालक श्याम देवनाथ शाहु वय ४५ वर्ष राह. भवानी नगर पारडी नागपुर यांचे बयाण नोंदविले अस ता ते आपल्या बयानात सांगतात कि, नागपुर जबलपु र रोड ने येत असता कन्हान नदीचे समोर ढाब्यातुन एक ट्रेलर निघाला त्याचा नंबर मला माहित नाही ट्रक अचानक समोर आल्याने माझे गाडीवरील संतुलन बिघडल्याने माझ्या ट्रक मागुन धडक बसली व त्या ट्रेलरनी १०० मीटर पर्यंत ओळत घेवुन गेला. ट्रेलर न थांबता पडुन गेला त्यामुळे माझ्या पोटाला मुकामार लागला होता.

माझ्या मालकाने उपचाराकरिता राधा कृष्ण रुग्णालय नागपुर येथे आणले होते तेथे उपचार करून मी घरी परत आलो व त्याच दिवशी सकाळी अचानक पोटाला दुखायला लागल्याने माझ्या घरच्या लोकांनी मला उपचार करिता मेडिकल कॉलेज नागपुर येथे भरती केले. माझा उपचार सुरु आहे. मला कोण त्याच प्रकारची पोलीस तक्रार करायची नाही असे आपले बयानात सांगितले. तरी सदर जख्मी यांचे मेडि कल कॉलेज नागपुर येथे उपचार सुरु असतांना  उपचारा दरम्यान मरण पावला. सदर मृतकाचे मरणा संबंधित कागदपत्र प्राप्त झाल्याने ट्रक मालकाने ट्रक (टिप्पर) क्र. एम एच ४० बी एल ५११७ च्या चालका विरुद्ध कलम २७९ , ३०४ (अ) भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!