पश्चिम विदर्भ

जिल्ह्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोविड अनुषंगाने शासन निर्देशाचे परिपुर्ण पालन आवश्यक 

 शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांना दोन्ही डोज बंधनकारक

 शाळा स्वच्छ व निर्जंतूक करण्याच्या सूचना

 पालकांनी दोन्ही डोज घेण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 29 सप्टेंबर : ज्या गावात सध्या एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही अशा ठिकाणी शासन निर्देशाप्रमाणे शाळा सुरू करण्यात याव्या, मात्र शाळा सुरू करतांना सर्व खाजगी व शासकीय शाळांनी कोविड अनुषंगाने शासन निर्देशाचे परिपुर्ण पालन करणे आवश्यक राहील अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.

ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करणेबाबत आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसुल भवन येथे आढावा सभा घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुडधे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, प्रशासन अधिकारी निता गावंडे, विस्तार अधिकारी डॉ. किशोरी जोशी, शिल्पा पोलपल्लीवार,उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वासुदेव डायरे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमीक) दीपक हाते, आरोग्य अधिकारी विजय अग्रवाल प्रामुख्याने हजर होते.

जिल्हाधिकारी येडगे यांनी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई, बसचालक यांचेसह 100 टक्के कर्मचाऱ्यांचे लसिकरण आवश्यक असल्याचे व ते वरिष्ठांकडून प्रमाणिक करून घेण्याचे, तसेच त्यांच्या कुटूंबाचे लसीकरण बंधनकारक राहील असे सांगितले. पालकांनी देखील दोन्ही डोज घेतल्यास कोरोनाचा प्रसार कमी होईल यास्तव पालकांना लसिकरणाचे दोन्ही डोज घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने करावे असे सांगितले. तसेच उद्यापासूनच सर्व शाळा स्वच्छ करून निर्जतुकीकरण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शाळा सुरू झाल्यावर एखाद्या गावात कोरोना पॉझेटिव्ह रूग्ण आढळल्यास तेथील शाळा पुढील सुचनेपर्यंत बंद करून तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसींग करावी व सर्वांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग दिनांक 4 ऑक्टोबर पासून सुरू करावयाचे आहेत. जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच वर्ग असणाऱ्या ग्रामीण भागात 521 शाळा असून शहरी भागत 257 अशा एकूण 778 शाळा आहेत. यात 3 लाख 15 हजार 173 विद्यार्थी व 8384 शिक्षक असल्याची माहिती विस्तार अधिकारी डॉ. किशोरी जोशी यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!