पश्चिम विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ,आज मिळाले एवढे रुग्ण

यवतमाळ दि. 05 जानेवारी (प्रतिनिधी) :

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 19 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 40 व बाहेर जिल्ह्यात पाच अशी एकूण 45 झाली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1118 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 19 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1099 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी येथील एक, बाभुळगाव दोन, पुसद येथील एक, यवतमाळ येथील 14 व इतर जिल्ह्यातील एक रूग्ण असून त्यात सात महिला व 12 पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73023 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71190 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 88 हजार 925 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 15 हजार 835 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.26 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 1.70 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1757 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1757 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 775 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!