पश्चिम विदर्भ

खा. भावना गवळी यांना ईडीचे समन्स, या तारखेला हजर राहण्याचे निर्देश

शिवसेनेच्या नेत्या आणि यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना (ED)  ईडीने समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan) याला ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला आहे. खासदार गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भावना गवळी यांच्यावर नेमके आरोप काय?

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना सत्र न्यायालयाने दिली 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत ईडी कस्टडी दिली आहे. सईद खानला परवा रात्री ईडीने अटक केली होती. एनजीओचं व्यावसायिक कंपनीत रुपांतर केल्याचा आरोप खान यांच्यावर आहे. सईद खान यांच्या अटकेमुळं भावना गवळी यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!