नागपूर

पोलीस शिपाई पदासाठी 30 सप्टेंबरला लेखी परिक्षा

नागपूर दि. 28 : ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 28 चालक पोलीस शिपाई पदासाठी पोलीस भरती करीता सन 2019 जाहीरात देण्यात आली होती.त्यांची लेखी परिक्षा 30 सप्टेंबर रोजी आहे.

तुळशिरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नोलॉजी ,मोहगाव ,वर्धा रोड बुटीबोरी या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.या परिक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र 24 सप्टेंबर पासून त्यांच्या ई-मेल आयडी व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रवेशपत्र एचटीटीपीएस कोलन स्लॅश महापोलीस आरसी डॉट महाआयटी एक्झाम डॉट इन या पोर्टलवरून देखील डाऊनलोड करता येतील. उमेदवारांनी लेखी परिक्षेकरीता ओळखपत्र प्राप्त होण्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी पुढील क्रंमाकावर ,मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. मोबाईल क्रमांक 9699792230, 8999783728, 9309868270, 9823087522 ग्रामीण नियंत्रण कक्ष-0712-2560200 असे उमेश फुंदे कार्यालय अधीक्षक, जिल्हा ग्रामीण, नागपूर यांनी कळविले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!