पूर्व विदर्भ

प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामसभेत अपात्र ठरलेल्या  लाभार्थ्यांनी 15 दिवसाचे आत आक्षेप किंवा तक्रार नोंदवावी

वर्धा, दि 28 सप्टेंबर :  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत घरकुल उपलब्ध करुण देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या करीता शासनाचे वतीने आवास प्लस सॉप्टवेअर विकसित करण्यात आलेले असून या माध्यमातून सर्वेक्षण करुन पात्र, अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे 26, 27 व 28 सप्टेंबर रोजी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामसभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अल्पसंख्यांक व इतर ) व अपात्र यादी ग्रामपंचायत मध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे. यादीमध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या अपात्र असलेल्या लाभार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रार नोंदवावयाची असल्यास यादी प्रसिध्द झाल्यापासुन 15 दिवसाचे आत संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांच्या भ्रमणध्वनीवर किंवा ई-मेल आयडी नोंदवावी असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

व्ही. व्ही मडावी, गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्वी 9860929545 ई-मेल bdoarvi2010@gmail.com, एम.डी. बारापात्रे – आष्टी 9923908462 bdoasti@gmail.com,,पंकज भोयर – देवळी 9284121015 bdodeoli@gmail.com, दिनेश चौधरी – हिंगणघाट 8007352371 bdohinganghat@gmail.com, प्रविण देशमुख – कारंजा 9764901110 bdokaraja@gmail.com, शालीकराम पडघम – समुद्रपूर व सेलू 9421735721 bdosamudrapur@gmail.com, psseloo@gmail.com,अनिल गावंडे – वर्धा 9960815546 bdowardha@gmail.com यांच्या भ्रमणधवनीवर किंवा ईमेल वर तक्रार नोंदवावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!