पूर्व विदर्भ

शासकिय कार्यालयांनी दैनंदिन वापरातील होणारा कागद मगनसंग्रहालयास दयावा

 निरुपयोगी कागदापासुन तयार केलेल्या वस्तूवर खरेदीत मिळणार सुट.

वर्धा, दि 27 सप्टेंबर:  शासकिय कामकाज करतेवेळी कागदपत्रांचा वापर करीत असतांना बराच कागद वाया जातो कागदाची निर्मिती ही वृक्षापासुन केली जात असून अनावश्यक व्यर्थ जाणा-या कागदामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे. यासाठी मगनसंग्रहालय समितीच्या वतीने निरुपयोगी कागदावर प्रक्रिया करुन त्यापासुन कार्यालयास उपयोगी वस्तू बनविण्यात येत आहे. त्यामुळे शासकिय कार्यालयांनी दैनंदिन वापरात खराब होणारा कागद मगणसंग्रहलयास दयावा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिल्या.

निरुपयोगी कागदापासुन मगणसंग्रहालय समितीच्या वतीने फाईल्स, राईटिंग पॅड, लिफाफे, कॅरी बॅग, डस्टबिन, टिकोस्कर, सॉप्ट बोर्ड, नोटीस बोर्ड इत्यादी वस्तू बनविण्यात येत असून शासकिय कार्यालयास विक्रीस उपलब्ध असणार आहे. तसेच शासकिय कार्यालयानी निरुपयोगी कागद मगनसंग्रहालयास दिल्यास वस्तू खरेदीवर सुट सुध्दा मिळणार आहे. यासाठी शासकिय कार्यालयानी मगनसंग्रहालयातील सुशमा सोनटक्के यांच्या 9834412431 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

2 ऑक्टोंबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिन अंहिसा दिवस म्हणुन सर्वत्र साजरा होत असतांना पर्यावरण पुरक अशा उपक्रमात शासनाच्या सर्व विभागांनी सहभागी होऊन पर्यावणाचे संर्वधनाच्या दिशेने पाऊल उचलावे तसेच शासकिय शासनसामुग्री खरेदीच्या रक्कमेत बचत करुन शासनाच्या निधीची सुध्दा बचत करावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!