नागपूर

नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटल ने हार्ट फेल्युअर क्लिनिक “दिल धडकने दो’’ सुरू केले

‘जागतिक हृदय दिन’ दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. या वर्षी, नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलने हार्ट फेल्युअर झालेल्या रुग्णांसाठी समर्पित असे हार्ट फेल्युअर क्लिनिक- “दिल धडकने दो” सुरू केले आहे.

वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरच्या तज्ज्ञ आणि अत्यंत कुशल कार्डियाक चमूच्या उपस्थितीत क्लिनिक सुरू करण्यात आले. या चमूमध्ये डॉ नितीन तिवारी, सीनियर कन्सल्टंट- कार्डिओलॉजी, डॉ अच्युत खांडेकर, सीनियर कन्सल्टंट- कार्डिओलॉजी, डॉ दिनेश पडोळे, कन्सल्टंट- कार्डिओलॉजी आणि डॉ समीत पाठक, वरिष्ठ सल्लागार- कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जरी यांचा समावेश आहे.

हार्ट फेल्युअर म्हणजे काय?

क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना, डॉ तिवारी यांनी माहिती दिली की हार्ट फेल्युअर याचा अर्थ हृदयाने काम करणे थांबवले असा होत नाही. उलट, याचा अर्थ असा होतो की हृदय सामान्यपेक्षा कमी कार्यक्षमतेने कार्य करते आहे. असे होण्यामागे विविध संभाव्य कारणे जसे, हृदय आणि शरीरातून रक्त मंद गतीने फिरणे आणि हृदयावर दबाव वाढणे इत्यादींचा समावेश असू शकतो. परिणामी, हृदय शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांना पंप करू शकत नाही. हार्ट फेल्युअर हे देशात आणि जगभरात मृत्यूच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. एका अभ्यासानुसार हार्ट फेल्युअरच्या 50% रुग्णांचा निदानाच्या पहिल्या पाच वर्षांत मृत्यू होतो आणि 90% रुग्णांचा पुढील दहा वर्षांत मृत्यू होतो.

 

डॉ.दिनेश पडोळे यांनी हार्ट फेल्युअरच्या कारणांविषयी माहिती दिली आणि सांगितले की इतर कारणांमुळे देखील हृदयाला इजा पोचल्यास किंवा हृदय कमकुवत झाल्यास अनेकदा हार्ट फेल्युअरचा धोका संभवतो. तथापि, जर हृदय खूपच कडक /स्टिफ झाले तर हार्ट फेल्युअर होऊ शकते. हार्ट फेल्युअर मध्ये , हृदयाचे मुख्य पंपिंग चेंबर्स (वेंट्रिकल्स) कडक होऊ शकतात ज्यामुळे ठोक्यांच्या दरम्यान हे चेम्बेर्स व्यवस्थित भरले जात नाहीत. काही लोकांमध्ये हृदयाचे स्नायू खराब आणि कमकुवत होऊ शकतात. वेंट्रिकल्स त्या टप्प्यापर्यंत खेचले जातात की हृदय शरीरातून पुरेसे रक्त पंप करू शकत नाही. डॉ दिनेश पडोळे यांनी हार्ट फेल्युअरची प्रमुख कारणे समजावून सांगितली आणि सांगितले की, हृदयाचे नुकसान झाल्यावर किंवा इतर परिस्थितींमुळे कमकुवत झाल्यानंतर HF विकसित होतो,जसे की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील प्रमुख अडथळे (80% प्रकरणे), संधिवाताचा हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, दाहक स्थिती (उर्वरित 20%).

यावेळी बोलताना डॉ.अच्युत खांडेकर यांनी हार्ट फेल्युअरच्या लक्षणांवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की कालांतराने, हृदय शरीराच्या उर्वरित भागांमध्ये रक्त पंप करण्याच्या विशिष्ट मागण्या पूर्ण करू शकत नाही. हार्ट फेल्युअर हे दीर्घ काळापासून सुरु असलेले (क्रॉनिक) असू शकते किंवा ते अचानक (तीव्र) सुरू होऊ शकते. हार्ट फेल्युअरची चिन्हे आणि लक्षणांमध्ये खालील लक्षणे समाविष्ट असू शकतात:

कामात किंवा निवांत असताना श्वास लागणे

थकवा आणि अशक्तपणा

पाय, घोट्या आणि तळव्यांमध्ये मध्ये सूज

जलद किंवा अनियमित हृदयाचे ठोके

व्यायामाची क्षमता कमी होणे

सतत खोकला किंवा पांढरा किंवा गुलाबी रक्त-रंगाच्या श्लेष्मा / म्युकस सह घरघर होणे

पोटाच्या भागावर (उदर) सूज

द्रव जमा झाल्यामुळे खूप वेगाने वजन वाढणे

मळमळ आणि भूक न लागणे

लक्ष केंद्रित करण्यात अडचण किंवा सतर्कता कमी होणे

हृदयविकाराचा झटका आल्यामुळे छातीत दुखणे

 

डॉ दिनेश पडोळे यांनी एचएफच्या वैद्यकीय व्यवस्थापनाबद्दल देखील बोलले आणि सांगितले की योग्य मार्गदर्शक तत्त्वांद्वारे मार्गदर्शन केलेले ऑप्टीमल वैद्यकीय व्यवस्थापन हा हार्ट फेल्युअर व्यवस्थापनाचा पाया आहे आणि रुग्णांना अनेक लक्षणे मुक्त वर्षे देऊ शकतो. ते म्हणाले की बीटा ब्लॉकर्स, एआरएनआय, एसजीएलटी 2 इनहिबिटर, एमआरए हे एचएफच्या उपचाराचा कणा आहेत आणि या रुग्णांमध्ये योग्य द्रव आणि सोडियम टायट्रेशनवर भर दिला आहे. त्यांनी हे देखील नमूद केले की एचएफ रुग्ण सामान्यतः आजारी पडतात आणि दुय्यम संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होतात आणि ते म्हणाले की या सर्व रुग्णांना वेळोवेळी न्यूमोकोकल आणि इन्फ्लूएन्झा लसी मिळाल्या पाहिजेत.

 

पुढे चर्चा करताना, चमूने ने हार्ट फेल्युअरचे निदान, डिव्हाइस थेरपी आणि सर्जिकल व्यवस्थापनाची माहिती दिली.CABG साठी ऑपरेट केलेल्या रुग्णांना कधीकधी हार्ट फेल्युअरचा त्रास होतो. हृदयाचे पंपिंग सुधारण्यासाठी सीआरटी लावल्या जाऊ शकते, अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी करण्यासाठी एआयसीडी लावल्या जाऊ शकते जेणेकरून हार्ट फेल्युअर झालेल्या रुग्णाचे अनमोल आयुष्य वाचविता येऊ शकेल.

 

डॉ. समित पाठक यांनी हार्ट फेल्युअर झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया व्यवस्थापनाची माहिती दिली. ते म्हणाले की, हार्ट फेल्युअर सुधारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (सीएबीजी), वाल्व बदलण्याची शस्त्रक्रिया आणि हृदय प्रत्यारोपण यांचा समावेश आहे. डॉ.पाठक यांनी हेही सांगितले की, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर हृदय प्रत्यारोपणावरही मोठ्या प्रमाणावर काम करण्याचे नियोजन करत आहे.

हार्ट फेल्युअर क्लिनिक दररोज दुपारी 1 ते दुपारी 2 पर्यंत कार्यरत राहील. या तासांच्या पलीकडे वैद्यकीय सेवेची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी, वैद्यकीय चमू 24×7 उपलब्ध असेल. हे क्लिनिक सर्वसमावेशक सेवा प्रदान करते. याठिकाणी सर्वात अनुभवी वैद्यकीय चमुंपैकीपैकी एक आहे. इथे सर्व आवश्यक चाचण्या आणि तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध आहेत, तसेच पोषणतज्ज्ञ, फिजिओथेरपीटिक पुनर्वसन, समुपदेशक, टेलिफोनिक फॉलो-सारख्या इतर सहाय्यक वैशिष्ट्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

 

वोक्हार्ट हॉस्पिटल हे शहरातील एक मान्यताप्राप्त नाव आहे. कार्डिओलॉजी, मेंदू आणि मणक्याचे आजार निदान आणि उपचार, ऑर्थो आणि जॉइंट रिप्लेसमेंट, लेप्रोस्कोपिक सर्जरी, डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण, ईएनटी, कॅन्सर केअर, क्रिटिकल केअर, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, रुग्णवाहिका सुविधा, 24×7 आपत्कालीन सेवा आणि 24×7 फार्मसी सेवा अश्या वैद्यकीय सुविधा इथे एका छताखाली मिळू शकतात. वोक्हार्ट हॉस्पिटलविषयी अधिक माहिती येथे मिळू शकते: 0712 6624444/4100.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!