नागपूर

नागपूरला एक्सपोर्ट हब म्हणून विकसीत करणार :जिल्हाधिकारी विमला आर.

नागपूर दि. 24 : नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे. दळणवळणाच्या सर्व सोयी सुविधा व आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बलस्थाने लक्षात घेता नागपूर हे एक्सपोर्ट हब म्हणून विकसीत करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला.आर यांनी आज केले.

उद्योगभवनात आयोजित एक दिवसीय एक्सर्पोटर्स कॉनक्लेव्हच्या उदघाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या . यावेळी मिहानचे विकास आयुक्त डॉ.व्ही सरमन,/विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कॉन्सिल (वेद) या संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार राव, विदर्भ इन्डस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, उद्योग सहसंचालक ए. पी. धर्माधिकारी, मिहानचे मुख्य व्यवस्थापक संतोष कुमार सिंग, यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नागपूर हे शहर भौगोलिकदृष्ट्या वाहतुकीसाठी सोयीचे आहे. येथे मिहान आणि इतर परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने व उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण असल्याने निर्यातक्षम उत्पादकांना त्यांचा माल जगभर पाठविता येईल. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली संधी आहे. त्यांनी गुंतवणूक करावी, असे श्रीमती विमला म्हणाल्या.

शासन उदयोग व निर्यातीसाठी अनेक पूरक धोरण राबवत असून आत्मनिर्भर भारत व ग्लोबल टु लोकल साठी नव -उदयोजकांनी निर्यात प्रोत्साहन आराखडयात त्यांच्या सूचना देण्याचे आवाहन सहसंचालक धर्माधिकारी यांनी केले.

“पोन्टेशिअल फॉर एक्सपोर्टस फ्रॉम विदर्भा” या विषयावर शिवकुमार राव यांनी प्रकाश टाकला. विदर्भात अनेक जिल्हयात खनिजासह,कृषी उत्पादने तसेच ॲटोमोबाईलचे स्पेअर पार्ट व अन्य बाबीचे दर्जेदार उत्पादन होतात.त्यात संत्री व भिवापूरी मिरची तसेच टसर साड्यांसाठी इथे भौगोलिक मानांकन मिळालेले जिल्हे आहेत. गेल्या काही वर्षात दळणवळणाच्या सोयीने जग हे एक खेडे झाले आहे. त्यामुळे इथल्या उत्पादकांनी त्यांचा माल व उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी निर्यात करणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी आवश्यक बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहभागी उदयोजकांच्या अडचणीचे निराकरण केले.

यावेळी केंद्र शासानाच्या निर्देशानुसार जिल्ह्याचा निर्यात प्रोत्साहन आराखडा (एक्सपोर्ट प्रमोशन प्लॅन) तयार करण्याचे काम सूरू असून त्याचे सादरीकरण श्री. भारती यांनी केले.

जिल्हा निर्यात प्रोत्साहन आराखडयाला परिपूर्ण करण्यासाठी उद्योजकांनी, धोरण अभ्यासकांनी सूचना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

निर्यातीतील वाटा उचलण्यासाठीही नागपूर शहर सज्ज आहे. रेल वाहतूक, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक यांच्यासह शहराजवळील ड्राय पोर्टचा उपयोग करुन देशांतर्गत आणि देशाबाहेर कृषी उत्पादने पुरविणे सुलभ होणार आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रात्री परदेशात जाणाऱ्या विमानातून दोहा, दुबई, अबुधाबी येथे फळे, भाज्या निर्यात केल्या जातात.

निर्यातीसाठी भारताला खरोखर आत्मनिर्भर करण्यासाठी मोठ्या, मध्यमसह लघू उद्योगांनी पूढे येण्याचे आवाहन सहसंचालक धर्माधिकारी यांनी केले.

उद्घाटन सत्रानंतर निर्यातीच्या संधीवर सनदी लेखापाल वरूण विजयवर्गी, अपेडाच्या योजनावर पी. ए. बामणे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!