
महाराष्ट्र
भारत बंद ला राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन,बंद मध्ये सहभागी होण्याचे आव्हान
देशातील विविध संघटनांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा असणार असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे. (Bharat Bandh on 27 September 2021: Nearly 100 groups to join shutdown; ncp’s support)
जयंत पाटील यांनी परभणीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. देशभरातील 100 पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. या बंदला आमचा पाठिंबा असून आम्ही बंदमध्ये सहभागी होऊ, असं पाटील यांनी सांगितलं. यावेळी पत्रकार परिषदेला खासदार फौजिया खान उपस्थित होत्या.