नागपूर

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई 

नागपूर,ता. २४ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (२४ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४०५१६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,८६,१७,०००/- चा दंड वसूल केला आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे धरमपेठ झोन अंतर्गत ८, हनुमाननगर झोन अंतर्गत ५, धंतोली झोन अंतर्गत १, गांधीबाग झोन अंतर्गत ३, लकडगंज झोन अंतर्गत २ आणि आशीनगर झोन अंतर्गत ५ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंत ३५०४६ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ७५ लक्ष २३ हजार वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!