ग्रामीण

रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळले दोन अज्ञात मृतदेह

नागपूर/२२ सप्टेंबर:-रेल्वे पटरीची पाहणी करतांना रुळावर कटलेल्या अवस्थेत दोन अज्ञात इसमांचे मृतदेह आढळून आल्याची घटना बुटीबोरी पोलीस हदीतील मौजा सोनूर्ली शिवारात दि.२२ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना असी की, घटनादिनी  काही रेल्वे कर्मचारी रेल्वे पटरी ची पाहणी करीत असतांना त्यांना रेल्वे लाईन ०२६९ वर पोल क्र.८०६ /१० आणि १२ चे मध्यंतरी दोन अज्ञात इसमांचे मृतदेह कटलेल्या अवस्थेत दिसून आले.त्यांनी याची माहिती फिर्यादी रेल्वे प्रबंधक यांना दिली.घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना देण्यात आली.पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सोनटक्के तसेच पोह असलम नौरंगाबादे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

मृतक हे अंदाजे ४० ते ४५ आणि ४५ ते ५० वयोगटातील असून एकाच्या अंगावर निळ्या रंगाचे टी शर्ट,खाकी रंगाचा बरमुडा आणि वर्ण गोरा तर दुसऱ्याच्या अंगावर हिरव्या रंगाचा टी शर्ट,निळ्या रंगाचा बरमुडा तर वर्ण गोरा असून सदर मृतकाविषयी परिसरात चौकशी केली असता ते अनोळखी असल्याची माहिती मिळाली.मृतकांच्या वर्णनावरून ते मजूर वर्गाचे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करिता रवाना करून घटनेची नोंद करण्यात आली.पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!