पूर्व विदर्भ

आरटीपीसीआर चाचणीला प्राधन्य द्या   -प्रेरणा देशभ्रतार               

वर्धा,दि.21 (प्रतिनिधी) : सण उत्सवाच्या काळात नागरिक मोठया प्रमाणा गर्दी करीत असल्यामुळे नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासोबतच शहरी भागातील लसीकरणावर भर दयावा यासाठी नगर पालिकांच्या अधिका-यांची नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करुन नोडल अधिका-यांनी प्रभाग निहाय संपर्क अधिकारी नेमुण प्रभाग निहाय पथक तयार करुन पथकामार्फत नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याबाबत जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कोविड लसीकरण इतर लसीकरण व विविध आरोग्य योजनेच्या आढावा बैठकित केल्यात

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरण व इतर लसीकरण, प्रधानमंत्री मातृवंदना योजना राष्ट्रीय जंतनाशक मोहिम आदी योजनेच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या

बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी वेद पाठक, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, महिला बाल कल्याणचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल मेसरे, शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.

जिल्हयाचे नागरिकांचे पहिल्या व दुस-या डोसचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील कर्मच्या-याच्या लसीकरणासाठी जिल्हा उद्योग केंद्राची, सहकार क्षेत्रातील जिल्हा उपनिबंधक, कृषि व्यवसायिकासाठी कृषि विभागाचा तसेच व्यवसायिकाच्या लसीकरणाकरीता व्यापारी संघटनेचे सहकार्य घ्यावे यासाठी नोडल अधिका-यांनी वेळोवेळी लसीकरणाचा आढावा घ्यावा. शासनाच्या प्रत्येक विभाग प्रमुखांनी कर्मच्या-याचे लसीकरण झाल्याबाबत अहवाल सुध्दा सादर करण्याच्या सूचना देशभ्रतार यांनी दिल्यात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत प्रथम प्रसुती होणा-या महिलांना मानधनाचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांना बँक खाते उघडण्यासाठी प्रोत्साहित करावे . 21 सप्टेंबर पासुन जिल्हयात जंतनाशक मोहिम राबविण्यासाठी आशा , अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचा-या मार्फत प्रत्येक कुंटूबाचे सर्वेक्षण करुन जंतनाशक मोहिम यशस्वी करावी अशाही सूचना देशभ्रतार यांनी दिल्यात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!