नागपूर

जिल्हाधिकारी यांचे जनतेस आवाहन,दोन दिवसा करिता नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट

*भारतीय हवामान खाते यांचा सतर्कतेचा इशारा* 

*दिनांक २१ व २२ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी चा इशारा* 

*दोन दिवसा करिता नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट*

भारतीय हवामान खाते (IMD) यांनी विदर्भा करिता दिनांक २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधी साठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागपूर जिल्ह्याला दिनांक २१ व २२ सप्टेंबर या कालावधी करिता येलो अलर्ट देत बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर जिल्हयात काही ठिकाणी वादळीवाऱ्या सह विज व अतिवृष्टी चा इशारा दिला आहे.

तसेच जिल्ह्यातील धरणाची पातळी देखील भरपूर प्रमाणात भरेलेली असून या अनुषंगाने *नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर यांचे द्वारे करण्यात येत आहे*

 

धरणात क्षेत्रात पडणारा पाऊस व आजू-बाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा आवकामुळे पुर परिस्थिती लक्षात घेता द्वारे असणारे मोठे धरणाचे वक्रव्दार (गेट) केव्हाही उघडण्यात येवू शकतात.व द्वारे नसणारे धरणातील पाणी साठा १०० % पेक्षा जास्त झाल्यावर नदि/ नाल्यातुन पुराचे पाणी वाहणार असल्याकारणाने नदी काठावरील सर्व नागरिकांनी/ शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना व नदी पात्रातून आवागमण करणा-या सर्व संबंधितांनी स्वत:ची काळजी बाळगावी.

*नागरिकांनी घ्यावयाची काळजी*

🛑 भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरण बाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेऊन सतर्क रहावे.

 

🛑कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका

 

🛑 नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा

 

🛑 मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.

 

🛑 जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका.

 

🛑 नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.

 

🛑 अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका

 

🛑 धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका

 

🛑 घडलेल्या घटनेची / आपत्ती ची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी

 

*नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय* *नियंत्रण कक्ष ०७१२-२५६२६६८ टोल फ्री क्र. १०७७*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!